बीड -जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा कृष्णा अर्बन बँकेचे अध्यक्ष विक्रम मुंडे यांच्यासह मुलाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाने आत्महत्या केली आहे. कृष्णा अर्बन बँकेच्या बीड शाखेच्या परिसरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने स्वतःच्या फेसबुक पेजवर संस्थाचालकांनी कशा प्रकारे त्रास दिला हे लिहिले आहे.
केळगाव येथील आश्रम शाळेत विनाअनुदानीत पदावर शिक्षक म्हणून काम शिक्षकाने शनिवारी सकाळी बीड शहरातील कृष्णा बँकेच्या दारातच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
केज तालुक्यातील केळगाव येथील धनंजय अभिमान नागरगोजे राहणार.देवगाव ता.केज हा कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता.सदरील शिक्षक हा गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान तत्वावर कार्यरत होता . सरकारने २०१९ साली २० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती . मात्र ते अनुदान सुरू झाले नाही . गेल्या अनेक वर्षांपासून अनुदान नसतानाही विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणार्या शिक्षकाने अखेर आपली जीवनयात्रा संपवली.
संस्थाचालक विक्रम मुंडे यांच्या संस्थेवर अठरा वर्षांपासून नोकरीस असलेल्या नागरगोजे यांना पगार मिळतं नव्हता. अनेकवेळा मुंडे व त्यांच्या मुलाला भेटून विचारणा केली, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मला पगार द्या नाहीतर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असे म्हटल्यानंतर टू मर म्हणजे आम्हाला तुझ्या जागेवर दुसऱ्या माणसाला घेता येईल असे उत्तर दिल्याचे नागरगोजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply