बीड -शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावर बीडचे उल्हास गिराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणारे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षांकडून तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्यावर आरोप केले होते. पत्रकार परिषद घेऊन खिंडकर यांचे आका माजी आ अमरसिंह पंडित असल्याचा आरोप केला होता.
त्यानंतर पक्षाने याची गांभीर्याने दखल घेत त्यांची हकालपट्टी केली. त्यांच्या जागेवर बीडचे उल्हास गिराम पाटील यांच्यावर गेवराई आणि आष्टी मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
उल्हास गिराम पाटील हे गेल्या पंधरा वीस वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या सोबत पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. बीड शहर प्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख अशा अनेक पदावर काम केल्याचा त्यांना अनुभव आहे.
गिराम यांच्या नियुक्तीने सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होतं आहे.
Leave a Reply