बीड -मारहाण, खंडणी या सारख्या गुन्ह्यात प्रयागराज येथून अटक केलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या शिरूर तालुक्यातील ग्लास हाऊस या घरावर वनविभागाने बुलडोजर चालवले. वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेले खोक्याचे हे ग्लास हाऊस जमीनदोस्त करण्यात आले.
खोक्या भोसलेचे अनेक गुन्हेगारी व्हिडिओ समोर आल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी प्रयागराज इथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता त्याच्या घरावरही शासनानं कारवाई केली आहे. खोक्या गुन्हेगार आहे म्हणून नव्हे तर त्यानं वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन घर बांधल्याचं सरकारनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे इतके दिवस वनविभागाला हे अतिक्रमण असल्याचं दिसलं नाही, आत्ताच सरकारला जाग आली आहे.
दरम्यान, वनविभागानं सतीश भोसले ऊर्फ खोक्याला या बांधकामाबाबत नोटीसही पाठवण्यात आली होती. त्यानंतर वनविभागानं प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. शिरुर पोलिसांच्या मदतीनं बुलडोझर लावून खोक्याचं घर वनविभागानं पाडलं आहे. बीडमधील शिरुर कासार पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध स्वरुपाचे त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत.
Leave a Reply