बीड -शिरूर तालुक्यातील दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण करणारा तसेच दीड वर्षांपूर्वी एका व्यक्तीला बॅट ने मारहाण करणाऱ्या सतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड पोलिसांनी प्रयागराज मधून अटक केली आहे. त्याला शुक्रवारी बीडमध्ये आणले जाणार आहे.
शिरुरमध्ये एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचप्रकरणी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि भाजप पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्या हा पोलिसांच्या रडारवर आला होता. या मारहाण प्रकरणानंतर सतीश भोसलेचे अनेक कारनामे समोर आले होते. त्यानंतर त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचबरोबर त्याच्यावर शिरूर, चकलांबा पोलीस ठाण्यासह तिसरा गुन्हा वनविभागाने दाखल केलेला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून सतीश भोसले हा फरार झाला होता. बीड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. अखेर आता सतीश भोसलेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या याला बीड पोलिसांनी प्रयागराज या ठिकाणाहून अटक केली आहे. त्याला आज किंवा उद्या बीडला आणले जाईल, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.
Leave a Reply