News & View

ताज्या घडामोडी

भारतच चॅम्पियन!

दुबई -रोहित शर्मा ची तडाखेबंद खेळी आणि भारतीय गोलदाजांची अचूक गोलंदाजी यामुळे भारताने आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर केली. भारताने हा सामना 4 विकेट राखून जिंकला.

या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतकडून कर्णधार रोहित शर्माने चौकार – षटकारांची बरसात करत सुरुवात चांगली केली होती. त्याला दुसऱ्या बाजूने शुभमन गिल साथही देत होता. रोहितने अर्धशतकही केले.

तसेच शुभमन गिलसोबत शतकी भागीदारीही केली. त्यामुळे न्यूझीलंडसमोरील आव्हान कठीण झाले होते. परंतु, याचवेळी १९ व्या षटकात ग्लेन फिलिप्सने अफलातून झेल घेत न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले.

कर्णधार मिचेल सँटेनरच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु कव्हरच्या दिशेने येत असलेला हा चेंडू ग्लेन फिलिप्सने हवेत मागे उडी घेत एका हाताने झेलला. त्याचा हा झेल पाहून अनेक जण आश्चर्यचकीत झाले होते. पण त्याच्या झेलामुळे गिलला ५० चेंडूत ३१ धावांवर माघारी परतावे लागले. तो बाद झाल्यानंतर पहिल्या विकेटसाठीची १०५ धावांची भागीदारीही तुटली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने १०१ चेंडूत ६३ धावांची खेळी केली, तर मायकल ब्रेसवेलने ४० चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. तसेच रचिन रवींद्रने २९ चेंडूत ३७ धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने ३४ धावांचे योगदान दिले. त्यामुळे न्यूझीलंडने ५० षटकात ७ बाद २५१ धावा केल्या होत्या.

भारताकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या फिरकीपटूंनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनाही प्रत्येकी १ विकेट मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *