News & View

ताज्या घडामोडी

धनंजय मुंडेंचा राजीनामा!

मुंबई -राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेल्या नव्वद दिवसापासून सुरु असलेल्या आरोपांनंतर मंत्री मुंडे यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.

मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी क्रूर हत्या करण्यात आली. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे यांच्यासह इतरांचा सहभाग स्पष्ट झाला.

या सर्व आरोपीवर खून, खंडणी आणि ऍट्रॉसिटी चे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने सत्ताधारी आ सुरेश धस, विरोधी आ संदीप क्षीरसागर यांच्यासह इतरांनी लावून धरली होती.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु झाली आणि अखेर नव्वद दिवसांनी अर्थसांकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुंडे यांनी आपला राजीनामा दिला.

संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपीनी काढलेले फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर जनआक्रोश वाढल्याचे दिसून आले. त्यामुळेच मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *