News & View

ताज्या घडामोडी

देशमुख मर्डर, सोनवणे ला जामीन मंजूर!

केज -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ सोनवणे याला केज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात सोनवणे याचे नाव वगळण्यात आले होते, त्यानंतर सोमवारी त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

सीआयडीने आरोपपत्रातून सिद्धार्थ सोनवणेला वगळल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय. मकोका गुन्ह्यातला हा पहिलाच जामीन मंजूर झाला आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाविरोधात बीडसह राज्यभरात मोठ आंदोलन सुरु आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते.

राज्य सरकारने या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी आणि एसआयटीची स्थापना केली होती. मागच्या आठवड्यात सीआयडीने या प्रकरणी 1400 पानाच आरोपपत्र दाखल केलं. त्यानुसार वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याच सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. खंडणी उकळण्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असं सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विविध नेत्यांनी, ग्रामस्थांनी अशाच प्रकारचे आरोप केले होते. आरोपपत्रात सुद्धा हेच नमूद असल्यामुळे त्यावर आता शिक्कामोर्तब होत आहे. सीआयडीच्या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा मुख्य मास्टरमाइंड आहे.

कोण-कोणावर मकोका अंतर्गत कारवाई?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली होती.

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर झाला आहे. आरोपी सिद्धार्थ सोनवणेला केज कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 25 हजारांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर केला आहे. सिद्धार्थ सोनवणेविरोधात पुरावे नसल्याने सीआयडीने आरोपपत्रात त्याच्या नावाचा समावेश केला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *