मुंबई -केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती करण्याबाबत शब्द दिला होता.
विशेष सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या सात मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या सात मागण्यांपैकी उज्जवल निकम यांच्या नियुक्तीची एक मागणी मान्य करण्यात आली आहे. उज्जवल निकम यांच्या नियुक्तीच, हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी स्वागत केलं आहे.
उज्ज्वल निकम यांनी 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेपासून ते मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यापर्यंतचे खटले यशस्वीरित्या लढवले आहेत. मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.आरोग्य पथकाकडून धनंजय देशमुख व संतोष देशमुख यांच्या आई शारदबाई देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. धनंजय देशमुख यांनी कालपासून पाणीही घेतलेलं नाही. धनंजय देशमुख यांचा रक्तदाब सामान्य असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली.
नवनीत कावत यांचा निरोप काय?
केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे धनंजय देशमुख यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आले आहेत. मागण्या मान्य होत आहेत आंदोलन स्थगित करा हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा निरोप वैभव पाटलांनी धनंजय देशमुख यांना दिला.
Leave a Reply