News & View

ताज्या घडामोडी

वाळू माफियांच्या मालमत्तेवर बोजा!जिल्हाधिकारी पाठक यांचा दणका!!

बीड – बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. जिल्ह्यातील तब्बल 38 ते 40 वाळू माफियांनी गेल्या दोन तीन महिन्यात गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी तब्बल 80 कोटिपेक्षा अधिकारी रकमेचा दंड केला आहे. दंड न भरल्यास संबंधित वाळू माफियांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा टाकण्यात आला आहे. त्यानुसार बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी चार वाळू माफियांच्या मालमत्तेवर बोजा टाकण्याचे आदेश दिले आहेत. अविनाश पाठक यांच्या या कारवाईने वाळू माफियामध्ये खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, परळी, आष्टी या भागात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होतं असल्याच्या तक्रारी येतं होत्या. विशेष बाब म्हणजे अनेक तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस कर्मचारी हेच या वाळूच्या माफियासोबत पार्टनर असल्याचे समोर आले होते.

या सर्व बाबीचा अभ्यास केल्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या 40 वाळू माफि्यांच्या गाड्यामधून गेल्या दोन महिन्यात किती वाळू वाहतूक झाली याचे फुटेज पाडळसिंगी येथील टोल नाक्यावरून घेतले. त्यानंतर या वाळू माफियांना तब्बल साडेअकरा हजार नोटीस पाठवण्यात आल्या.

त्यावर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न आल्याने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या सर्वाना किमान दोन ते जास्तीत जास्त पाच कोटी रुपये दंड केला.

बीड तालुक्यातील पालवण येथील बाबासाहेब एकनाथ मस्के याला दोन कोटी ब्यानव लाख साथ हजार दंड केला, तसेच त्याच्या पालवण येथील गट न 120,124 आणि 88 मधील मालमत्तेवर बोजा टाकण्यात आला आहे. कुर्ला येथील निहाल मजीद पठाण याला तीन कोटी आठ्यांऐंशी लाख बासष्ठ हजार रुपये दंड करून त्याच्या कुर्ला येथील गट न 170,138 आणि बीड येथील घरावर बोजा टाकला आहे.

कुर्ला येथीलच महेश केरबा गुंड याला एक कोटी साठ लाख एक हजार रुपये दंड करून त्याच्या गट न 14 मधील मालमत्तेवर बोजा टाकला आहे. त्याचप्रमाणे पालवण येथील वाळू माफिया मनोज रामभावू पवार याला चार कोटी अठ्यांनव लाख छत्तीस हजार रुपये दंड केला असून त्याच्या घोसापुरी येथील गट न 131,पालवण येथील गट न  319,गवळवाडी येथील गट न  94 आणि बीड येथील घरावर बोजा टाकण्यात आला आहे.

याबाबतचे आदेश बीडचे तहसीलदार शेळके यांनी काढले आहेत.जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाळू माफियावर धडाकेबाज कारवाई सुरु केल्याने मागील महिना दीड महिन्यापासून वाळू चोरीचे प्रकार थांबल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *