बीड -जमिनीचा थकीत मावेजा न दिल्या प्रकरणी बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कैद करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने खळबळ माजली आहे.
तक्रारदार राजेश पोकळे यांची जमीन शासनाने संपादित केली होती. त्यापोटी त्यांना 2018 साली 13 लाख 19 हजार रुपये मावेजा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
मात्र शासकीय दप्तरं दिरंगाई मुळे तक्रादाराला मावेजा मिळालाच नाही. त्यामुळे बीडच्या दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कैद करण्याचे आदेश दिले आहेत.
Leave a Reply