दुबई -आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तान चा सहा विकेटनी धुव्वा उडवला. विराट कोहलीच्या खेळीने भारताने 242धावांचे लक्ष्य सहज पार केले.
242 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताच्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने जोरदार सुरवात केली. रोहित 31 धावावर बाद झाला.त्यानंतर विराट कोहलीनं डावाची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यानं संयमाने फलंदाजी करत धावफलक चालता ठेवला.
विराटनं 62 चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फॉर्मबाबत चाहत्यांना असलेल्या चिंतेतून दिलासा मिळाला.दरम्यान, विराटनं वन डे क्रिकेटमध्ये 14000 धावांचा टप्पाही ओलांडला आहे. ही कामगिरी करणारा कोहली जगातला चौथा फलंदाज ठरला.
कोहलीने 299 सामन्यांत 287 इनिंग्जमध्ये हा विक्रम पूर्ण केला. या धावा करताना कोहलीची सरासरी 57.86 तर स्ट्राईक रेट 93.44 राहिला.वनडेमध्ये धावांचा विचार करता कोहलीच्या पुढं फक्त सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा आहेत.
श्रेयस अय्यरनेही कोहलीला चांगली साथ दिली. त्यानं अर्धशतकी खेळी केली.
दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागिदारीही केली.
पाकिस्तानची धिमी सुरवात!
पाकिस्ताननं सावध सुरुवात करत 40 धावांची ओपनिंग पार्टनरशिप केली.दरम्यान, गोलंदाजीला सुरुवात केल्यानंतर भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीची लय फारशी चांगली वाटत नव्हती. त्यानंतर त्यानं गोलंदाजी करतानाच फिजिओंचा सल्ला गेला.
त्यानंतर तो फिजिओबरोबर ड्रेसिंगरूममध्ये गेल्यानं, शमीच्या दुखापतीच्या मुद्द्यावरून भारतीय संघाच्या चिंता वाढल्या होत्या.पण शमीच्या जागी गोलंदाजीचा भार खांद्यावर घेतलेल्या हार्दिक पांड्यानं नवव्या ओव्हरमध्ये पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.
बाबर आझम 23 धावांंवर बाद झाला.त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये कुलदीपच्या गोलंदाजीवर एक धाव चोरण्याच्या प्रयत्नान इमाम उल हक बाद झाला.अक्षर पटेलनं डायरेक्ट हीट करत त्याला धावबाद केलं.त्यानंतर काहीवेळानं शमी पुन्हा मैदानात आला आणि त्यानं 12 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीही केली.
रवींद्र जडेजानंही कमाल दाखवली. तय्यब ताहीरला अवध्या 4 धावांवर बोल्ड करत आल्या पावली परत पाठवलं. या विकेटनंतर पाकिस्तानची धावसंख्या 5 बाद 165 झाली होती.त्यानंतर सलमान आगा आणि खुलदील यांनी 200 धावांपर्यंत जडाप पुढं नेला. पण कुलदीपनं सलमान आगाला 19 धावांवर बाद केलं. आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर शाहीन शाह आफ्रिदीलाही पायचित केलं.
त्यामुळं पाकिस्तानची धावसंख्या 7 बाद 200 झाली होती. त्यानंतर कुलदीपनं नसीम शाहलादेखिल बाद केलं. कोहलीनं त्याचा झेल घेतला.त्यानंतर पुन्हा एकदा अक्षर पटेलनं हारीस रऊफला धावबाद केलं. तर शेवटच्य ओव्हरमध्ये खुशदीलला हर्षितनं बाद करत पाकिस्तानचा डाव संपुष्टात आणला.पाकिस्ताननं सर्वबाद 241 धावा केल्या.
भारताकडून कुलदीपनं तीन, हार्दिकनं 2 तर हर्षित, अक्षर आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तर दोन धावबाद झाले.पाकिस्तानकडून सऊद शकीलनं सर्वाधिक 62 धावा केल्या. तर कर्णधार रिझवाननं 46 आणि खुशदीलनं 38 धावा केल्या.
Leave a Reply