News & View

ताज्या घडामोडी

जिल्हा परिषदेचे सिइओ जिवने यांची परीक्षा केंद्रावर धडक!

बीड-माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 पासून बीड जिल्ह्यात सुरू असून शुक्रवारी मराठीच्या पहिल्याच पेपरला बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी बीड शहरातील विविध केंद्रांना भेट देऊन मराठी विषयाचे पेपर ला कॉपी करताना एका विद्यार्थ्याला रेस्ट तिकीट केले आहे .


पासून बीड जिल्ह्यातील 156 केंद्रावर इयत्ता दहावीचा मराठी विषयाचा पेपर होता.मुख्यकार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी बीड शहरातील शिवजी माध्यमिक विद्यालय, बीड येथे सर्व प्रथम भेट दिली भेटीच्या वेळी केंद्रावर अनियमितता दिसून आली.तर केंद्र संचालक याच्यावर कारवाई चे निर्देश देण्यात आले.
भगवान विद्यालय बीड येथे भेट दिली असता cctv, खिडक्याचे तावदाने व परीक्षा केंद्राबाहेरील त्रास,गर्दी कमी करण्याच्या सूचना केंडसंचालक व पोलीस यंत्रणेला दिल्या.
चंपावती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला त्या विद्यार्थ्यांला रेष्ट तिकीट करण्यात आले.त्या नंतर इंदीरा गांधी उर्दू केंद्राला भेट दिली.
परिक्षा केंद्राबाहेरील उपद्रव, सी.सि. टी.व्ही कॅमेरे, खिडक्यांची तावदाने, प्रत्येक परीक्षा केंद्र कॉपीमुक्त,बैठेपथक,
इ.बाबत भेटीच्या वेळी केंद्रसंचालक उपस्थित शिक्षण विभागाच्या यंत्रणेला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत
यावेळी शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी नानभाऊ हजारे,प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी मिलिंद तुरूंकमारे व गटशिक्षणाधिकारी कार्यालय पं. स.बीडचे शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम पवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *