सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४६
🌞 संवत्सर : क्रोधीनाम
🌕 ॠतु…. शिशीर
🚩 उत्तरायण 🌕 माघ शुक्ल चतुर्दशी /पौर्णिमा प्रारंभ संध्या ०६/५५ मि.
🌸 नक्षञ… पुष्य
🌸 वार… मंगळवार
🌼 दिनांक….. ११ फेब्रुवारी २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/११ मि.
🌘 सुर्यास्त ०६/१५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी मंथन‼️
. ‼️दिनांक ११ फेब्रुवारी २०२५‼️
मेष:- आज चंद्राचा गुरूशी लाभ योग आहे. अनुकूल दिवस आहे. नावलौकिक मिळेल. राजकीय यश प्राप्त होईल. शब्दांना मान मिळेल. धन संपत्ती वाढेल.
वृषभ:- तृतीय स्थानी चंद्र आहे. काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील. नात्यातून सहकार्य लाभेल.
मिथुन:- उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. कर्जे मंजूर होतील. कुटुंबातून सहकार्य मिळेल.
कर्क:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन आनंदी राहील. व्यवसायात भरघोस वाढ होईल. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल.
सिंह:- व्यय स्थानी चंद्र आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. खर्च वाढतील. आध्यत्मिक लाभ होतील. अंतर्मुख व्हाल.
कन्या:- लाभ स्थानी चंद्र आहे. अत्यंत चांगले अनुभव येतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
तुळ:- नोकरीत सुखद अनुभव येतील. कामाचा ताण कमी होईल. मात्र वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. आधुनिक तंत्रज्ञान कामास येईल.
वृश्चिक:- आर्थिक बाबतीत आज भाग्य उजळेल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन संधी मिळतील. राजकीय क्षेत्रात मात्र जपून पावले टाका.
धनु:- अष्टम स्थानी चंद्र आहे. संमिश्र दिवस आहे. काही कामे मार्गी लागतील. पारिवारिक कामाला प्राधान्य द्यावे लागेल. व्यसने टाळा.
मकर:- प्रतिस्पर्धी गप्प होतील. संतती बाबत चांगली बातमी समजेल. प्रतिष्ठा पणास लागेल. सामाजिक कामातून मनस्ताप संभवतो.
कुंभ:- आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. जमीन व्यवहारात यश मिळेल. कामे मार्गी लागतील. आरोग्य सांभाळा.
मीन:- अनुकूल दिवस आहे. विविध प्रश्न मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल.
Leave a Reply