नवी दिल्ली -मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एन. बिरेन सिंह यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
गेल्या वर्ष दीड वर्षांपासून दोन समाजातील संघर्षामुळे मणिपूर धूमसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्यापैकी कोणीच त्या दुर्घटना ग्रस्त भागाला भेट ण दिल्याने विरोधी पक्षांकडून टीका झाली होती.
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या कारभाराबद्दल देखील पक्षांतर्गत तीव्र नाराजी होती. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव देखील दाखल झाला होता. अखेर रविवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
Leave a Reply