News & View

ताज्या घडामोडी

सुरेश धस आधुनिक भगिरथ -देवेंद्र फडणवीस!

आष्टी -आष्टीचे आ सुरेश धस हे आधुनिक भगीरथ आहेत असं म्हणत या योजनेसह नदीजोड प्रकल्पामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ होईल असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. बीड जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा असेही फडणवीस म्हणाले.

आष्टी येथे खुंटेफळ तलावाच्या उपसा जलसिंचन योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मंत्री पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, खा बजरंग सोनवणे, आ प्रकाश सोळंके, आ संदीप क्षीरसागर, आ विजयसिंह पंडित, आ नमिता मुंदडा यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरेश धस यांच्या पाठपुरावयाचे कौतुक केले. आपण जलसिंचन मंत्री असतांना या योजनेला अकरा हजार कोटी रुपये दिले. मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

उपसा योजना सोलर वर -फडणवीस!

राज्यातील सर्वच उपसा जलसिंचन योजनासाठी जी वीज लागते त्याचा बोजा शेतकऱ्यांवर पडतो, त्यामुळे यापुढे सर्वच उपसा योजना सोलर वर असतील अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करा!

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन केले जाईल असे सांगताना या जिल्ह्याने अनेक नेते दिलेत, जुने वैभव पुन्हा आणण्यासाठी आणि जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्यासाठी सकरव जाती धर्माच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *