आष्टी -मला या भागातले लोक शिवगामी म्हणतात त्या अर्थाने मी देवेंद्र फडणवीस यांची माता आहे, त्यामुळे त्यांच्याप्रति माझ्या मनात ममत्वभाव आणि आदरभाव आहे. सुरेश अण्णा तुम्ही प्रेम केलं मी पण मनापासुन प्रेम करणारी आहे, मेरा वचन ही मेरा शासन है असं म्हणत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभा गाजवली.
आष्टी येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या कि, मी या कार्यक्रमाला येणार कि नाही अशी चर्चा होती, मात्र कार्यक्रम शासकीय आहे अन मी शासनात मंत्री आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. सुरेश अण्णा तुम्ही जयदत्त च्या लग्नाला मला साडीचोळी देऊन निमंत्रण दिलं, मी आले, आता सागरच्या लग्नाला निमंत्रण दिलं तर नक्की येणार.
मला पराभूत करून निवडून आलेले खासदार बजरंग सोनवणे इथे आहेत, बीड जिल्ह्याने अनेकांना संधी दिली. जिल्ह्यात पाच युतीचे आमदार असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आजही महायुतीचे पाच आमदार आहेत आणि फडणवीस मुख्यमंत्री आहेत. हा योगायोग आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात सुरेश धस यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित सर्वांच्या नावाचा उल्लेख करत जोरदार भाषण केले. त्यांच्या भाषणामुळे धस आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद कमी झाल्याचे चित्र दिसून आले.
Leave a Reply