आष्टी -राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी लाडका आहे, त्यामुळे अनेकजण मला विचारतात तुमच्याकडे काय आहे तेव्हा मी सांगतो मेरे पास देवेंद्र फडणवीस है. तुम्ही पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करा अशी मागणी आष्टीचे आ. सुरेश धस यांनी केली. त्यासोबतच बीड जिल्ह्यातील वाळू, आणि राख माफियाना मकोका लावा अशी मागणी धस यांनी केली.
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. आ सुरेश धस पुढे म्हणाले कि, या प्रकल्पमुळे आष्टी तालुक्यातील दुष्काळ कायमचा मिटणार आहे. यपाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी अधिकची पाणी पुरवठा योजना करावी अशी मागणी त्यांनी केली.
जिल्ह्याची बदनामी कोणी केली -धस!
फडणवीस साहेब, काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी केली जातं आहे. पन या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटील, राखमाजी गावडे, केशरकाकु क्षीरसागर, बबनराव ढाकणे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते दिले. या जिल्ह्याने अनेक जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक दिले, पन काही लोकांनी गुंडाना राजश्रय दिला. त्यामुळे राख आणि वाळू माफियाना मकोका लावा अशी मागणी आ धस यांनी केली.
Leave a Reply