छत्रपती संभाजीनगर-मातृशक्ती हीच आमची भारताची मुळशक्ती असुन आज सर्व क्षेत्रात यशस्वीनींनी यशोशिखर गाठले आहे.महिला सबलीकरणाचा प्रामाणिक प्रयत्न हा स्वतःपासून करावा लागेल तरच स्त्री पुरुष समानता खऱ्या अर्थाने स्थापित होईल असे प्रतिपादन परळीचे माजी नगराध्यक्ष तथा अमृत संस्थेचे सल्लागार बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.ब्राह्मण महिला मंचाच्या वतीने शानदार राज्यस्तरीय सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शंभर कर्तृत्ववान महिलांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.
ब्राह्मण महिला मंच, घे भरारी फेसबुक ग्रुप व यशस्वी उद्योजिका समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना शाल,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र अशा स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर परळीचे माजी नगराध्यक्ष तथा अमृत संस्थेचे सल्लागार बाजीराव भैया धर्माधिकारी, परशुराम हिंदू सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा अमृत संस्थेचे सल्लागार विश्वजीत देशपांडे पुणे, संभाजीनगर चे माजी उपमहापौर संजय जोशी, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस अमृता पालोदकर, ब्राह्मण महिला मंचच्या अध्यक्षा विजया कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांना सेवा रत्न, समाज रत्न ,शिक्षण रत्न ,आरोग्य रत्न, कलारत्न .आणि उद्योग रत्न असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात दोन बंधूंनाही गौरविण्यात आले. अनिल डोईफोडे नांदेड आणि राजेंद्र पोद्दार वसमत यांचाही समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना बाजीराव धर्माधिकारी म्हणाले की,ज्यांना स्त्री माता म्हणून कळाली ते जिजाऊंचे शिवबा झाले. ज्यांना स्त्री बहीण म्हणून कळाली ते मुक्ताईचे ज्ञानेश्वर झाले.आपण सर्वजण केवळ भाषणात महिला सबलीकरणं व स्री पुरुष समानता या मोठ मोठ्या विषयांवर बोलत असतो. मात्र खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःच्या घरापासून ते देशाच्या कारभारापर्यंत जेंव्हा स्त्रीला अधिकार प्राप्त होतील तो दिवस महिलांसाठी ऐतिहासिक ठरेल.आता परिस्थिती खूप झपाट्याने बदलत आहे.चूल आणि मूल तसेच आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणारी माय माऊली,आपल्या गावाचा,राज्याच्या,देशाचा कारभार चालवत आहे.असे कोणते क्षेत्र नाही की जिथे महिलांची यशोगाथा लिहिली गेली नाही.या सर्व यशस्विनी एक एक शिखरे प्रादाक्रांत करीत आहेत असे त्यांनी सांगितले. विश्वजीत देशपांडे म्हणाले अमृत संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना बळ मिळणार आहे तरुण तरुणी व्यावसायिक महिला अशा सर्व घटकांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी संजय जोशी व सौ अमृता पालोदकर यांची समयोचीत भाषणे झाली. सौ विजया कुलकर्णी यांनी संस्थेचा कार्य अहवाल मांडला.
यावेळी सौ. राजश्री कुलकर्णी यांनी बहारदार सूत्रसंचलन करून सर्वांची मने जिंकलीसौ. मीनाताई झाल्टे यांनी आभार प्रदर्शन केले व उज्वला ताईंनी स्वागत गीत गायले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.विजया कुलकर्णी, सौ सुषमा पाठक, सौ.मीना झालटे, सौ.प्रतिमा भाले, सौ.जयश्री चोब, सौ.उज्वला पैठणे, सौ.राजश्री एरंडे, सौ. वंदना कुलकर्णी दिशा स्वयंपाक घरच्या सौ.जयश्री डफळापुरकर, रांगोळी रेखाटन सौ.मनिषा खडके,कु. गिरिजा ठोसर आदींनी परिश्रम घेतले.
Leave a Reply