News & View

ताज्या घडामोडी

Gevrai Police Station 1

निलंबित पोलीस दोन दिवसापासून गायब!

बीड -पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी वाळू प्रकरणात निलंबित केलेला पोलीस कर्मचारी अशोक हंबर्डे हा दोन दिवसापासून गायब असल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी चार वाजेपासून त्यांचा मोबाईल बंद असल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.

बीड जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध पोलीस अधीक्षक यांनी कारवाई सुरु केली आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांना त्यांनी नुकतीच समज दिली.

बीड जिल्ह्यात गुटखा, मटका, वाळू, राख यामुळे गुंडगिरी वाढीस लागली आहे. त्यातून खून, खंडणी असे प्रकार घडतं आहेत. या सगळ्या गोष्टीची दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी कारवाईचा धडाका लावला आहे.

चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहणावर कारवाई करण्याचे आदेश डावलून कर्तव्यात कुचराई करणाऱ्या गेवराई ठाण्यातील दोघांवर कावत यांनी शुक्रवारी निलंबणाची कारवाई केली. यात पोलीस कर्मचारी अशोक हंबर्डे यांचा समावेश आहे.

झालेली कारवाई चुकीचे असल्याचे सांगत हंबर्डे यांनी शुक्रवारी दुपारी चार वाजेपासून आपला मोबाईल बंद करत निघून गेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला. मात्र ते कुठेच सापडले नाहीत. शनिवारी याबाबत गेवराई पोलिसांना माहिती देण्यात आली.

दरम्यान दोन दिवस झाले तरीही सदरील हंबर्डे नावाचे कर्मचारी अद्याप सापडले नाहीत. त्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली आहे. गेवराई पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *