News & View

ताज्या घडामोडी

सुदर्शन घुले ला पोलीस कोठडी!

केज -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.डिजिटल पुरावे तपासायचे असल्याचं सांगत एसआयटीने पोलीस कोठडीची मागणी केली होती.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याचा मोबाईल तपासण्यासाठी एसआयटीकडून आज पोलीस कस्टडी मागणी करण्यात आली. संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याचा मोबाईल मधील डाटा तपासामध्ये हस्तगत करण्यात आला आहे. याच संदर्भात चौकशी करण्यासाठी सुदर्शन घुले याची पोलीस कस्टडी हवी आहे. दुसरा मोबाईल जो सुदर्शन घुले याचा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्या मोबाईलचे लॉक अद्याप उघडलेले नाही. तेही उघडायचे असून त्याचा तपास करायचा आहे.

आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध करताना डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आधीच पोलिसांकडे मोबाईलमधला डेटा होता तर आता कोणता मोबाईल ओपन करायचा आहे असा प्रश्न आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला.

यापूर्वीच तपास करत असताना जो डिजिटल इव्हिडन्स पोलिसांच्या हाती लागला आणि त्यातून असं सांगण्यात आलं की आरोपीच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती अथवा पश्चाताप पाहायला मिळाला नाही. मोबाईल आधारित माहिती 14 दिवसांपूर्वीच पोलिसांकडे होती तर मग आता कोणता मोबाईल त्यांना ओपन करायचा आहे? असा प्रति प्रश्न आरोपीचे वकील अनंत तिडके यांनी विचारला.

ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्याच्या काही तासानंतरच पोलिसांनी जे वाहन ताब्यात घेतलं त्यातच मोबाईल आढळून आले होते. मग इतक्या दिवस हे मोबाईल जर पोलिसांच्या ताब्यात आहेत तर तो तपास आतापर्यंत का झाला नाही असा प्रश्न सुद्धा यावेळी आरोपीच्या वकिलाने विचारला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकत आरोपी सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी पोलीस कोठडी देण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *