News & View

ताज्या घडामोडी

अजित पवार बीडचे पालकमंत्री, पंकजा मुंडे जालना!

मुंबई -राज्य सरकारने पालकमंत्री पदाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली तर अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असतील. पंकजा मुंडे यांच्यावर जालन्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर राज्यभर झालेल्या आंदोलनानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देऊ नये अशी मागणी समोर आली होती. दरम्यान सरकारने जाहिर केलेल्या यादीनुसार बीडचे पालकमंत्री अजित पवार असणार आहे. अजितदादांकडे बीड आणि पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहे.

राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कोणत्या मंत्र्यांला कोणते खाते मिळणार हा ही विषय संपुष्टात आला तोच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न चर्चेला आला होता. महायुतीमध्ये खातेवाटपाच्या तिढ्यानंतर पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस

नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
> ठाणे – एकनाथ शिंदे
> पुणे – अजित पवार
> बीड – अजित पवार

> सिंधुदुर्ग- नितेश राणे
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ

सांगली – चंद्रकांत पाटील
> सातारा -शंभुराजे देसाई
> छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
> जळगाव – गुलाबराव पाटील
> यवतमाळ – संजय राठोड
> कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
> अकोला – आकाश फुंडकर
> भंडारा – संजय सावकारे

> बुलढाणा – मंकरंद जाधव
> चंद्रपूर – अशोक ऊईके
> धाराशीव – प्रताप सरनाईक
> धुळे – जयकुमार रावल
> गोंदिया – बाबासाहेब पाटील
> हिंगोली – नरहरी झिरवळ
> लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
> मुंबई शहर – एकनाथ शिंदे
> मुंबई उपनगर –आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा/
> नांदेड – अतुल सावे
> नंदुरबार – मानिकराव कोकाटे
> नाशिक – गिरीश महाजन
> पालघर – गणेश नाईक
> परभणी – मेघना बोर्डीकर
> रायगड – अदिती तटकरे
> सिंधुदुर्ग- नितेश राणे
> रत्नागिरी – उदय सामंत
> सोलापूर – जयकुमार गोरे
> वर्धा – पंकज भोयर
> जालना – पंकजा मुंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *