केज -खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला देशी विदेशी दारू दुकान काढण्यासाठी देण्यात आलेला ना हरकत परवाना केज नगर पंचायत ने रद्द केला आहे अशी माहिती हारून इनामदार यांनी दिली.
वाल्मिक कराड याने हंसराज देशमुख यांच्याकडून जागा विकत घेतली होती, त्यांचसोबत या जागेत देशी विदेशी दारू विक्रीचे दुकान काढण्यासाठी नगर पंचायत कडे ना हरकत प्रमाणपत्र मागणी केली होती.
नगर पंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांनी तात्काळ ना हरकत दिले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती.
याबाबत कुठलेही नियम ण पाळता, नगर पंचायत च्या सर्वसाधारण सभेत विषय ण मांडता दिलेले हे ना हरकत नगर पंचायत ने बैठक घेऊन रद्द केले आहे. याबाबत हारून इनामदार यांनी माध्यमाना ही माहिती दिली.
Leave a Reply