News & View

ताज्या घडामोडी

राखेच्या हायवाने उडवले, सरपंचाचा मृत्यू!

परळी -परळी: राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकी स्वराला उडविले अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाल्याची घटना परळी तालुक्यातील मिरवट येथे घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा परळी मधील अवैध राख वाहतुकीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

बीडच्या परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने मोटरसायकल स्वाराला उडविले आहे. या अपघातात परळी तालुक्यातील सौंदाना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर हा अपघात झाला जात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतात.

अभिमन्यू क्षीरसागर हे सौंदना येथे त्यांच्या गावाकडे शेतातले काम उरकून ते परळी कडे जात असताना साडेआठ वाजता मिरवट फाट्यावर त्यांना राख वाहतूक करणारे टिपरणे त्यांना उडवले व त्यांचा जागीच मृत्यू झाले आहे अत्यंत टू व्हीलर गाडीची बिकट परिस्थिती होऊन गेली आहे गाडीचा संपूर्ण चंदामेंदा झाला आहे.

मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यामध्ये असलेला वाल्मिक कराड यांचा संबंध याबाबत आ सुरेश धस यांनी जाहिर सभामधून परळी येथील अवैध राख वाहतूक आणि राख माफिया याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

कराड याच्यासह अजय मुंडे आणि इतरांवर धस यांनी राखेची अवैध वाहतूक करत असल्याचा आणि त्यातून कोट्यावधी रुपये कमविल्याचा आरोप केला होता.त्यानंतर या भागातील राख माफिया, औ्षणिक विजय निर्मिती केंद्र आणि तेथील सिंडिकेट याबाबत चर्चा सुरु झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *