News & View

ताज्या घडामोडी

प्राथमिक, माध्यमिक आणि पे युनिट!पैशाचा महापूर!!

बीड -शिक्षण संस्था सुरु करण्यासाठी चा प्रस्ताव असो कि वैयक्तिक मान्यता अथवा पेन्शन या सगळ्या कामासाठी प्राथमिक असो कि माध्यमिक शिक्षण विभाग या ठिकाणी लाखो रुपयांची आकरणी केली जाते. विशेष बाब म्हणजे या सगळ्यासोबत पे युनिट नावाच्या विभागात देखील लाखो रुपये घेतल्याशिवाय फाईल ला हातच लावला जातं नाही. या सगळ्या गोष्टी बिनबोभाट पणे सुरु असतात कारण देणारा आणि घेणारा दोघेही बिनलाजे असल्यासारखे वागतात.

बीडच्या माध्यमिक शिक्षण विभागात लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षण विभागातील भ्रष्टाचार यावर चर्चा सुरु झाली आहे. जिल्हा परिषद मध्ये बांधकाम, आरोग्य, सामान्य प्रशासन विभागात जेवढा पैसा नसेल तेवढा पैसा शिक्षण विभागात मिळतो असे अनुभवी लोक सांगतात.

या विभागात नानाभाऊ हजारे असोत कि महादेव काकडे यांच्यासारखे लोक दहा पंधरा वर्षांपासून त्यामुळेच एकाच जागेवर ठाण मांडून बसतात. वास्तविक पाहता प्रतिनियुक्ती करण्याचे अधिकार विभागीय आयुक्त यांना आहेत मात्र बीडमध्ये सगळे नियम धाब्यावर बसवलेले असतात ते इथेही दिसून येते.

जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग असो कि माध्यमिक या ठिकाणी वैयक्तिक मान्यता, संच मान्यता, वेतनश्रेणी वाढ, मेडिकल. बिल, पगार बिल, भत्ते इथपासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत अनेक कामे पडतात. ही सगळी कामे करण्यासाठी लाल्हो रुपये आकरले जातात.

खाजगी शिक्षण संस्थांचे कामे करण्यासाठी या दोन्ही ठिकाणी स्वतः संस्था चालक जातात किंवा काही दलाल ही कामे करून देतात. जिल्ह्यात बहुतेक संस्थांची कामे करण्यासाठी मुळे नामक व्यक्तिमत्व गुत्ते घेतो अशी चर्चा आहे. प्राथमिक असो कि माध्यमिक येथील शिपायापासून ते उपसंचालक यांच्या कार्यालयापर्यंत काम करण्याचे गुत्ते त्या मुळे कडे दिले जाते.

शिक्षण विभागात जेवढी कामे असतात त्याचा काही भाग हा पे युनिट शी संबंधित असतो त्यामुळे उल्या दोन्ही सोबत पे युनिट मध्ये सुद्धा पैसे वाटावे लागतात. या ठिकाणी रजिस्टर वर ठप्पा मारण्याचे म्हणजेच शिक्का मारण्याचे दोन ते पाच हजार घेतले जातात अशा तक्रारी आहेत.

प्राथमिक पेक्षा जास्त धंदा माध्यमिक मध्ये आहे, कारण खाजगी शाळांचे गुत्ते येथे जास्त मंजूर केले जाते. नागनाथ शिंदे असोत कि दुसरे शिंदे, पुरंदरे असो कि हजारे, काकडे हे सगळे कोणाकडून न्क कोणाकडून दिवसाकाठी दहा पाच हजार घरी नेल्याशिवाय यांना चैनच पडत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *