तब्बल चौदा कोटींचा दंड!
बीड -जिल्ह्यात माजलेल्या वाळू माफि्यांच्या दादागिरीला चाप लावण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी धडाकेबाज कारवाईस सुरवात केली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या पाच हयावा च्या मालकांना नोटीस पाठवत तब्बल चौदा कोटी रुपयांचा दंड ठोठवला आहे. पाठक यांनी वाळू माफि्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केल्याने खळबळ उडाली आहे. त्यासोबतच पाठक यांनी महसूल मधील भ्रष्ट तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर नीलम्बनाचे अस्त्र उगारल्याने भ्रष्टाचार करणाऱ्यांना धडकी भरली आहे.
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी शस्त्र परवाने असोत कि बियर बार परवाने अथवा अवैध वाळू उपसा (sand mafiya )या विरोधात मोहीम उघडली आहे.(avinash pathak ias )
गोदावरी पट्यात म्हणजेच गेवराई तालुक्यात गोदावरी नदीतून आणि सिंदफना नदीतून वाळू उपसा करून माजावर आलेल्या वाळू माफियाना दणका देण्यासाठी जिल्हाधिकारी पाठक यांनी पाडळसिंगी टोलनाक्यावरील फुटेज चा आधार घेतला आहे अशी माहिती त्यांनी न्यूज अँड व्यूज ला दिली.
दोन दिवसापूर्वी पाठक यांनी गोकुळ किसन गायकवाड या हयावा मालकाला सात कोटी रुपयांचा दंड ठोठवला होता.
एकीकडे स्वतः जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे कोट्यावधी रुपयांचा दंड करण्याची कारवाई करत असताना गेवराईचे तहसीलदार खोमणे मात्र हातावर हात ठेवून मूग गिळून का गप्प आहेत, त्यांचेही वाळू माफियासोबत काही लागेबंधे आहेत का याची चौकशी करण्याची मगणी होतं आहे.
बुधवारी त्यांनी समीर बाबुलाल शेख रा आहेर वाहेगाव याने दीड महिन्यात 105 ट्रिप वाळू उपसा केला त्याला तीन कोटी दहा लाख 49 हजार रुपये दंड केला आहे. न्यूज अँड व्यूज. तर रिजवान बशीर शेख रा हिरापूर याने दीड महिन्यात 192 ट्रिप केल्याने पाच कोटी, 36 लाख 27 हजार, ईश्वर शिवनाथ सुखदेव रा म्हाळस पिंपळगाव याने 39 ट्रिप केल्याने 1 कोटी 39 लाख दंड,न्यूज अँड व्यूज,गजानन भारत मुगूटराव रा बाग पिंपळगाव याने 92 ट्रिप केल्याने दोन कोटी 76 लाख तसेच अब्दुल बशीर अब्दुल सत्तर रा मोमीनपुरा याने 66 ट्रिप केल्या, news&views त्यामुळे या मालकाला दोन कोटी नऊ लाख रुपये दंड केला आहे.
पाठक यांनी या पाच वाहन मालकांना तब्बल चौदा कोटी पेक्षा अधिक दंड केल्याने खळबळ उडाली आहे.
पाठक यांनी वाळू माफिया विरोधात कारवाई सुरु केल्याने गेवराई सह जिल्ह्यातील वाळू माफिया अंडर ग्राउंड झाले आहेत. गेल्या काही दिवसात जालना रोडवर एकही हयावा दिसत नसल्याचे चित्र आहे.
वाळू माफियाना महसूल आणि पोलीस प्रशासनाचे सहकार्य असल्याचे अनेकवेळा उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे अनेक महसूल आणि पोलीस कर्मचारी यांची या धंद्यात पार्टनरशिप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेवराई तालुक्यातील गोदावरी पट्यात नोकरीस असलेले मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस निरीक्षक, शिपाई, बिट अंमलदार हे या कारवाईने संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Leave a Reply