बीड -राजकीय पुढारी अन पोलीस यांचे मधुर संबंध यावर राज्यात मोठी चर्चा चालू असताना बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याने लायसन नसलेली गाडी सोडण्यासाठी चक्क पंचवीस हजार रुपये घेतल्याची चर्चा आहे. आता यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना किती वाटा मिळाला हे त्यांनाच माहित.
बीडचे पोलीस दल सध्या संपूर्ण राज्यात बदनाम झाले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर पोलीस दलाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातं आहे. या हत्येचा तपास करण्यासाठी नियुक्त केलेल्या एस आय टी मधील काही अधिकारी अन कर्मचाऱ्यांवर आरोप झाले, त्यानंतर त्यांना दूर करण्यात आले.
एवढा सगळा गोंधळ एकीकडे सुरु असताना शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे मात्र व्यपारी, सामान्य व्यक्ति यांच्याकडून बिनधास्त लूट करत आहेत.
ज्या दिवशी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु होते, त्याच दिवशी या ठाण्याचे एक कर्मचारी एका वाहन चालकांसोबत तोडपाणी करत होते.सुरवातीला सत्तर हजार रुपये मागून नंतर हे प्रकरण पंचवीस हजारात मिटवून घेण्यात आले. हा सगळा प्रकार बार्शी रोडवर एका मोठ्या हॉटेल समोर घडला.
याबाबत शिवाजीनगर ठाण्याचे वरिष्ठ चौकशी करून कारवाई करणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
Leave a Reply