पाटोदा -सहकारात मोठी कामगिरी करणाऱ्या बांगर कुटुंबाच्या पाठीशी म्हणजेच पाटोद्याच्या पाठीशी आता परळीची ताकद असणार आहे असा शब्द माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.पाटोदा येथे सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांच्या सतराव्या वाढदिवसानिमित्त ‘सहकार महर्षी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या अभिष्टचिंतन सोहळ्याला सिनेकलावंतांसह विविध राजकीय नेते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शनिवारी या सोहळ्याला तुफान गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. जवळपास 20 हजार नागरीकांनी या फेस्टिव्हलमध्ये आपला सहभाग नोंदविला होता.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते असलेले दत्ता बारगजे आणि दिपक नागरगोजे यांचा सन्मान करण्यात आला तर कोविड योद्धा म्हणून डॉ.एल.आर.तांदळे, डॉ.प्रगती बिनवडे, डॉ.चैत्राली भोंडवे, डॉ.एस.एम. सावंत, डॉ.प्रताप जाधव, डॉ.मयूर शिंदे, डॉ.रविंद्र गोरे, डॉ.इम्रान शेख, डॉ.दत्ता बांगर, डॉ.सचिन जायभाये, डॉ.रविंद्र राजपुरे यांचा गौरव करण्यात आला.
पाटोदा शहरात रामकृष्ण बांगर यांच्या वाढदिवसानिमित्त माझा देव उत्सव समिती बीड जिल्ह्याच्या वतीने पहिल्यांदाच सांस्कृतिक कार्यक्रम, कोविड योद्धा, समाजसेवकांचा सन्मान समारोह पार पडला. रामकृष्ण बांगर यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध अभिनेते सुनिल शेट्टी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, मानसी नाईक, अभिलिप्सा पांडा, रूपाली भोसले, स्मिता गोंदकर, दर्शन साटम, कविता राम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
चाऊस मैदानावर रसिकांनी तुडूंब भरून गेले होते. जवळपास 20 हजार रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचे पहायला मिळाले. अगदी मैदानाच्या बाहेरही लोक रस्त्यावर उभा होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.धनंजय मुंडे यांनी रामकृष्ण बांगर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देवून बांगर कुटुंबियांच्या मागे परळीची ताकद उभी असल्याचे सांगितले. बांगर कुटुंबियांनी आयोजित केलेला हा भव्य दिव्य कार्यक्रम सामान्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असल्याचे मुंडे म्हणाले. आगामी काळात बांगर कुटुंबियांना आम्ही ताकद देवू असा विश्वास मुंडे यांनी दिला.
यावेळी आ.बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष बाळा बांगर यांच्या कार्याचे कौतूक केले. बाळा हा जुन्या नव्यांची मोट बांधणारा तरूण आहे. सर्वसमावेशक नेतृत्व कसे असते याचे उत्कृष्ट उदाहरण त्याच्याकडे पाहिल्यानंतर कळते असे आजबे म्हणाले. ही तुफान गर्दी बांगर कुटुंबियांवर प्रेम करणारी असून बाळाने कार्यक्रमाचे केलेले नेटके नियोजन अगदी चोख असल्याचे सांगत बाळाच्या कार्याचे आ.आजबेंकडून भरभरून कौतूक करण्यात आले.
या प्रसंगी माजी आमदार साहेबराव दरेकर नाना, परळी नगर परिषदेच्या गटनेते वाल्मिक कराड, फुलंचद कराड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष जुबेर चाऊस, औरंगाबाद येथील उद्योगपती राजु आंबरवाडीकर यांची उपस्थिती होती.
Leave a Reply