परभणी -मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माईंड वाल्मिक कराड याने सरेंडर करण्यापूर्वी त्याच्यावर पुण्याच्या मोठ्या रुग्णालयात उपचार सुरु होते असा सनसनाटी आरोप बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी केला.
परभणी येथे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी न्याय देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात परभणीच्या सर्व लोकप्रतिनिधी सह बीडचे आ संदीप क्षीरसागर हे देखील हजर होते.
यावेळी बोलताना आ क्षीरसागर यांनी गंभीर आरोप केले. बीड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात अधिकाऱ्यांच्या बदल्या असो कि गुंडगिरी हे सगळं वाल्मिक कराड यांच्या म्हणण्यावर होतं होते.
वाल्मिक कराड हेच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मास्टर माईंड आहेत. त्यांनी पुण्यात सरेंडर करण्यापूर्वी पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतले, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.
धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा!
जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आ संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केली.
मुंडेचा राजीनामा घ्या – प्रकाश सोळंके
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावर राहु नये, अशी आमची मागणी असल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंखे यांनी सांगितले आहे. आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींना देखील तेच सांगायचे आहे की त्यांना मंत्रिपदावर ठेवू नका. पक्षपातीपणे चौकशी होऊ द्या, असे सोळंके यांनी सांगितले आहे.
प्रकाश सोळंके यांनी पालकमंत्रिपदावरही मोठं भाष्य केलं आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती,जातीय सलोखा बिघडलेला आहे त्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे घ्याव,असे सोळंके यांनी म्हटलं आहे.
Leave a Reply