बीड -केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपीना मदत करणाऱ्या एका डॉक्टर सह अन्य दोघा जणांना एस आय टी ने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय असल्याने या प्रकरणी बीडमधील डॉ संभाजी वायबसे यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर धारूरमधून आणखी एकाला ताब्यात घेतलंय.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसआयटीच्या टीमने बीडमधील डॉ संभाजी वायबसे यांना ताब्यात घेतलं आहे. वायबसे यांची एसआयटीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. तर एसआयटीकडून धारूरमधील आणखी एकाला ताब्यात घेतल्याची सूत्राकडून माहिती आहे. दोघा जणांना पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आहे.
सीआयडीकडून कसून चौकशी सुरू आहे.फरार असलेल्या आरोपींची माहिती मिळवण्यासाठी चौकशी सुरू आहे.खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडी आणि आता एसआयटी या तीन तपास यंत्रणांच्या माध्यमातून केला जात आहे. आज एसआयटी या संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.
एसआयटीच्या स्थापनेचे आदेश गृहमंत्रालयाने काढल्यानंतर काही तासांमध्येच एसआयटी बीडमध्ये दाखल झाली. एसआयटीने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत तपासाची सगळी माहिती घेतली.दरम्यान , संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत.
Leave a Reply