मुंबई -स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येशी माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठेच संबंध नाही, मी त्यात आरोपी नाही मग मी राजीनामा का द्यावा असा प्रश्न उपस्थित करत जे राजीनामा मागत आहेत त्यांना ही मागणी करून समाधान मिळो असा मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंडे हे माध्यमाशी बोलत होते. ते म्हणाले कि, संतोष देशमुख यांची झालेली हत्या भयानक आहे, यातील दोषी आरोपीना फाशीच झाली पाहिजे. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा ही मागणी आपण स्वतः नागपूर अधिवेशनात केली होती.
या सगळ्या प्रकरणाचा तपास सी आय डी, एस आय टी आणि न्यायालयीन मार्गाने सुरु आहे. त्यामुळे यातील दोषींवर कठोर कारवाई होईल असेही ते म्हणाले. विजय वडेट्टीवार हुशार आहेत मात्र ते असा का बोलत आहेत हे त्यांनाच माहित.
बिन खात्याचा मंत्री कसा असतो हे ज्यांनी मागणी केली त्यांनाच विचाराव लागेल असा म्हणत त्यांनी आ प्रकाश सोळंके यांना टोला हाणला. जे माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत त्यांचे या मागणीमुळे समाधान होतं असेल तर चांगल आहे. असेही ते म्हणाले.
Leave a Reply