News & View

ताज्या घडामोडी

6d8492a221312e4f673a53172f85a8ff1735632857333987 original scaled

वाल्मिक कराड ला चौदा दिवसांची पोलीस कोठडी!

केज -अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सी आय डी ने अटक केलेल्या आरोपी वाल्मिक कराड याला पुण्याहून थेट केजला नेण्यात आलं. या ठिकाणी न्यायालयासमोर हजर केले असता चौदा दिवसांची सी आय डी कोठडी देण्यात आली आहे.

वाल्मिक कराड याने मंगळवारी पुण्याच्या सी आय डी ऑफिस मध्ये शरणागती घेतली. त्या ठिकाणी त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला बीड सी आय डी कडे सुपूर्द करण्यात आले.

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कराड याला केजच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी वीस मिनिटे चाचणी झाल्यानंतर कराड याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

कोर्टात काय झाला युक्तिवाद!

संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड चा सहभाग आहे का तपासायचे आहे

हत्या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत, त्यासाठी पंधरा दिवसांची कोठडी आवश्यक.

हत्या आणि ऍट्रॉसिटी मधील सहभाग तपासणे आवश्यक.

कराड यांच्या आवाजाचे नमुने तपासवयाचे आहेत.

अशा पद्धतीने सरकारी पक्ष आणि सी आय डी ने युक्तिवाद केल्याचे सूत्रांनी सांगितले.

कराड यांच्या वकिलांचा युक्तिवाद!

वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी पोलीस कोठडी ला विरोध करत न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली.

राजकीय द्वेषापोटी आरोप केले गेले आहेत.

खंडणी मागितली असा आरोप चुकीचा, कराड सरेंडर झालेत म्हणून न्यायालयीन कोठडी द्यावी.

पोलीस कोठडी मागणे चुकीचे, आवाजचे नमुने देण्यास तयार.

वाल्मिक कराड सामाजिक कार्यकर्ते, गरीब राजकारणी.

तेथून पूढे त्याला न्यायालयात दाखल केले. या ठिकाणी न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची सी आय डी कोठडी सुनावण्यात आली आहे.

वाल्मिक कराड याला केजला आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. कराड समर्थकांनी केलेली गर्दी दूर करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कराड हा सी आय डी च्या पाषाण रोड वरील कार्यालयात शरण आला. तब्बल नऊ पथके त्याच्या मागावर होती. शरण येण्यापूर्वी कराड याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावत आपला यात संबंध नसल्याचे म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *