News & View

ताज्या घडामोडी

फडणवीसांच्या एक्शनमुळे कराड शरण!302 नुसार कारवाई करा – आ धस!

मुंबई -या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना बिन खात्याचे मंत्री ठेवावे अशी मागणी त्यांच्याच पक्षाचे आ प्रकाश सोळंके यांनी केली होती असा म्हणत भाजपचे आ सुरेश धस यांनी मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि अवादा कंपनीला दोन कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक एक्शन घेतल्यानेच वाल्मिक कराड यांना सरेंडर व्हावे लागले, आता त्यांना कलम 302मध्ये आरोपी करावे अशी मागणी भाजपचे आ सुरेश धस यांनी केली आहे.

वाल्मिक कराड याने पुण्यात सी आय डी शरणागती घेतली. त्यानंतर आष्टी चे आ सुरेश धस हे मुंबई ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. त्या पूर्वी ते मीडियाशी बोलत होते.

धस पुढे म्हणाले कि, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या गतीने या घटनेचा तपास करण्यासाठी प्रयत्न केले. सी आय डी ने गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात चौकशी केली. प्रॉपर्टी सीज करण्याचे आदेश दिले. त्यामुळेच कराड यांना अटक व्हावे लागले.

संतोष देशमुख यांच्या हत्येत आका अटक झाले आहेत, आता चौकशीत सत्य समोर येईल. त्यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करून कट रचल्या प्रकरणी चौकशी करावी. आपण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, पण चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना बिन खात्याचे मंत्री ठेवावे अशी मागणी त्यांच्याच पक्षाचे आ प्रकाश सोळंके यांनी केली आहे अशी माहिती आ धस यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *