बीड -अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड यांना अटक झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कराड यांना अटक करण्याची मागणी केली जातं होती.
केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणावरून गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात वातावरण तणावपूर्ण बनले होते.
दरम्यान या प्रकरणात अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून वाल्मिक कराड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
वाल्मिक कराड यांना अटक करावी या मागणीसाठी बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर सी आय डी ने कराड यांच्या पत्नी सह बॉडीगार्ड आणि राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची चौकशी केली होती.
रविवारी रात्री पुणे येथून वाल्मिक कराड यांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
Leave a Reply