मुंबई -मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच ज्यांचे ज्यांचे बंदुकी सह फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी क्रूर हत्या झाली. या प्रकरणी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांच्या सह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तसेच वाल्मिक कराड यांच्यावर खंडणी मागितली म्हणून गुन्हा दाखल झाला.
मात्र यातील कराड याच्यासह अनेक आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आरोपीची संपत्ती जप्त करा आणि ज्यांचे ज्यांचे सोशल मीडियावर बंदूक, रिव्हलवर सह फोटो आहेत त्यांचे लायसन रद्द करा असे आदेश दिले आहेत.
Leave a Reply