बीड -महादेव एप च्या माध्यमातून परळीतील कोणाचे नऊ अब्ज रुपये अडकले, त्याला आका ने कस बाहेर काढलं इथपासून ते प्राजक्ता माळी च परळी कनेक्शन काय आहे इथपर्यंत भाजपचे आ सुरेश धस यांनी आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेस चे आ अमोल मिटकरी यांनी आपल्या नादाला लागू नये असा इशारा देताना धनंजय मुंडे यांनी आता तरी हवेतून खाली उतरावं असा सल्ला आ धस यांनी दिला.
बीडमध्ये नूतन एसपी नवनीत कावत यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते. पुढे ते म्हणाले कि,रश्मीका मंधाना, प्राजक्ता माळी, सपना चौधरी या विभूतींच्या तारखा कशा मिळतात, कशा मिळवायच्या अशा अभ्यासाला परळी पॅटर्न उपयोगाला येईल, अशा शब्दात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना चिमटे काढले.
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून संपूर्ण महाराष्ट्रात रोष निर्माण झाला आहे. विशेषत: बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अजूनही देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या जात नाहीयेत याच पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
धस म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेले ‘आका’ कुठे फिरत आहे, याची माहिती पोलिसांना दिली. आकांचा सहभाग ३०२ च्या गुन्ह्यात आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर पावले उचलून ‘आका’ला गजाआड करावे, अशी मागणी केल्याचे धस यांनी सांगितले. आका लवकरच पोलिसांच्या हाताला लागतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
बीडमधील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेविरोधात सर्वपक्षीयांच्या ‘मूक मोर्चा’विषयी विचारले असता, सर्व जाती धर्माचे नागरिक मोर्चात सहभागी होतील, आम्हीही सहभागी होऊ. जर आम्ही विरोधी भूमिका घेतली तर लोक चपलेने मारतील, असे धस म्हणाले.
लै कंबर हलवते ती कोण?धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत आणि राजकारणाबाबत सुरेश धस यांना विचारले असता, धनुभाऊंकडे गत पाच वर्षात एवढे पैसे कुठून आले? काय ते सांस्कृतिक कार्यक्रम..! रश्मिका मंदाना, लै कंबर हलवते ती सपना चौधरी, अलीकडे प्राजक्ता ताई माळीही परळीला यायला लागली आहे. ज्यांना कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे, येथून शिक्षण घ्यावे आणि देशभरात जाऊन त्याचा प्रचार प्रसार करावा, अशी उपहासात्मक टीका सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर केली.जिल्ह्यातल्या काळ्या व्यवहारांची माहिती बीड पोलिसांना दिलीपरळीत राख माफिया जास्त आहेत. पैसे दिले तर गाडी सुरू राहील नाही तर गाडी बंद करू, असे धमकावून पैसे उकलळे जातात, खंडणी मागितले जाते. असे प्रकार सऱ्हास होत असल्याचे सांगत अनेक काळ्या व्यवहारांची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.अरे बाबा तू पुन्हा पालकमंत्री हो…देशमुख हत्या प्रकरणावरून माझ्यावर आरोप करणाऱ्यांना माझे राजकारण उद्ध्वस्त करायचे आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. यावर सुरेश धस म्हणाले, अरे बाबा पालकमंत्री तू परत हो… आमचं लेकरू गेलंय, तुम्हाला राजकारणाचं पडलंय…
Leave a Reply