बीड -बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्यात अपयश आल्याच्या कारणावरून तडकाफडकी बदली झालेल्या एसपी अविनाश बारगळ यांच्या जागी नवे एसपी म्हणून नवनीत कांवत यांची नियुक्ती झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे डिसिपी असणारे नवनीत कांवत हे 2019 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
बीडचे एसपी बारगळ हे चार महिन्यापूर्वी बीडला रुजू झाले होते. मात्र जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात त्यांना अपयश आले. केज तालुक्यातील मस्साजोग येथे घडलेल्या संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि खून प्रकरणात पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आला होता.
या विषयावरून नागपूर येथील अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एसपी अविनाश बारगळ यांची बदली केली होती.
त्यांच्या जागेवर छत्रपती संभाजीनगर येथील डिसिपी नवनीत कुमार कांवत हे रुजू होतं आहेत.
Leave a Reply