केज -केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वॉचमन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून तब्बल नऊ बारा दिवसांनी ऍट्रॉसिटी चा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
आदर्श गाव करणारे मस्साजोग (ता. केज) येथील तरुण सरपंच संतोष देशमुख यांचा ता. नऊ रोजी अपहरण करुन खुन करण्यात आला. सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे व विष्णू चाटे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, या घटनेचे मुळ हे पवनचक्की पकल्पात वरील आरोपींनी गोंधळ घालून मारहाण करण्याची ता. सहा डिसेंबरची घटना आहे.
या ठिकाणी मस्साजोग येथील वॉचमन असून, त्याला मारहाण झाल्याने सरपंच देशमुख यांच्यासह गावकरी तेथे गेले आणि वरिल आरोपींना हुसकावून लावले. त्यामुळे त्यांनी खुन्नस काढण्यासाठी संतोष देशमुख यांचे ता. नऊ रोजी अपहरण केले. मात्र, ता. सहा रोजी झालेल्या भांडण आणि दलित वॉचमनला मारहाण केल्यानंतर त्याने केज पोलिस ठाणे गाठले.
मात्र, केज पोलिसांवर दबाव आणि आरोपींशी संगणमत असल्याने गुन्हा नोंद झाला नाही. त्यामुळे सरपंच देशमुख यांचा खुन झाल्याच्या पहिल्या दिवशीपासून आरोप आहे. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यातील फौजदार श्री. पाटील यांचे निलंबन करण्यात आले असून, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनाही सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. दरम्यान, सर्वत्र आरोप झाल्यानंतर अखेर केज पोलिसांनी या आरोपींवर अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा नोंद केला.
Leave a Reply