हैद्राबाद -जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रविवार 15 डिसेंबरला अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, रुग्णालयात दाखल केलं गेलं तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. झाकीर हुसेन लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थनाही केल्या जात होत्या, पण डॉक्टरांना झाकीर हुसेन यांना वाचवण्यात यश आलं नाही.
उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह राखा कुरेशी आणि आईचे नाव बीवी बेगम होते. झाकीर यांचे वडील अल्ला राख हेही तबलावादक होते.
झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले. याशिवाय मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधूनही पदवीचे शिक्षण घेतले.
झाकीर हुसैन यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. 1973 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ लाँच केला.
झाकीर हुसेन यांचे वडील अल्ला राख हे देखील प्रसिद्ध तबलावादक होते. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या बँडने अलीकडेच जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या भारत दौऱ्याची घोषणा केली होती. त्यांनी आपल्या संगीतातून अनेक भारतीयांना प्रेरणा दिली आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांच्या देखरेखीखाली त्यांनी संगीत शिकण्यास सुरुवात केली. झाकीर हुसैन यांनी वयाच्या 7व्या वर्षी पहिला परफॉर्मन्स दिला होता. झाकीर हुसेन हे पहिले भारतीय आहेत ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टसाठी आमंत्रित केले आहे.
Leave a Reply