केज -तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी रस्ता रोको करत आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. या घटनेने मसाजोग मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोग कडे जात असताना डोणगाव जवळ दोन वाहणातून येऊन
अज्ञात व्यक्तीनी गाडी अडवून गाडीची तोडफोड
करून संतोष देशमुख यांचे अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
मात्र काही तासानंतर बोरगाव- दहीटना
रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आलाअसल्याने एकच खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर गावाकऱ्यांनी रस्तारोको आंदोलन केले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
Leave a Reply