News & View

ताज्या घडामोडी

पहिल्याच भाषणात रोहित पाटलांनी सभागृह जिंकले!

मुंबई -अमृताहूनी गोड नाम तुझे देवा असं म्हणत आपलं नाव देवा आहे त्यामुळे विरोधी पक्षाला सुद्धा गोड वागणूक द्याल अशी अपेक्षा करतो असा उल्लेख करणाऱ्या आ रोहित पाटील यांनी पहिल्याच भाषणात सभागृहाचे मन जिंकले.

तासगाव कवठे महाकाळ मतदार संघातून विजयी झालेल्या रोहित पाटील यांनी आपल्या भाषणाने स्व आर आर आबांची आठवण करून दिली. राज्य विधानसभेचे सर्वात तरुण आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रतोद म्हणून विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबद्दल अभिनंदन प्रस्तावावर रोहित यांनी आपले मत मांडले.

जसे आपण सगळ्यात तरूण विधानसभा अध्यक्ष झाले आहात तसा मी सगळ्यात तरूण सदस्य आहे. त्यामुळे तुमचंदेखील एक तरुण सदस्य म्हणून माझ्याकडे लक्ष असले पाहिजे. आपणही वकील आहात, मी देखील वकिलीचे शिक्षण घेतोय. जसे पहिल्या बाकावरच्या वकिलाकडे (मुख्यमंत्री फडणवीस) तुमचे लक्ष असतं, तसंच लक्ष याही वकिलाकडे लक्ष ठेवावे ही विनंती असल्याचे रोहित पाटलांनी म्हटले.

माळवणकर यांनी मुंबई विधानसभेत चांगली कामगिरी केली. त्याच्या परिणामी पुढं लोकसभेत त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. फडणवीस यांनी दिल्लीत आपल्याला पाठवायला हरकत नव्हती, असा चिमटाही त्यांनी काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *