मुंबई -मी अडीच वर्षांपूर्वी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पदभार घेतला. मी सीएम म्हणजे कॉमन मॅन होतो आता डिसिएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन झालो आहे असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्याचे 21 वेळ मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर शपथ घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह विविध राज्याचे मुख्यमंत्री, सिने कलाकार, संत महंत उपस्थित होते.
यानंतर नूतन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मंत्रालयात बैठक घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपण अगोदर सीएम म्हणजे कॉमन मॅन होतो आता डिसिएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे. मागील अडीच वर्षात आपण अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले.
लाडकी बहीण, लाडका भाऊ,लाडका शेतकरी या योजनेतून लोकांनी पुन्हा सेवेची संधी दिली. आता आपली जबाबदारी वाढली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्य प्रगतीवर नेण्यासाठी काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Leave a Reply