News & View

ताज्या घडामोडी

तो पुन्हा आलाय!देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी एकमताने निवड!!

भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदि एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. त्यामुळे तो पुन्हा आलाय मुख्यमंत्री होण्यासाठी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीने मोठं यश मिळवलं. तब्बल 233 जगावर विजय मिळवला. मात्र मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स कायम होता.

शिवसेनेच्या गटनेते पदी एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेस च्या गटनेते पदी अजित पवार यांची निवड झाली होती. परंतु भाजपच्या गटनेते पदाचा पेच कायम होता.

दरम्यान बुधवारी हा सस्पेन्स संपला. केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला तर सुधीर मुनगुन्टीवार यांनी अनुमोदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *