बीड – माझ्या विरोधातील उमेदवाराने निवडणूक काळात पैशाचा बाजार मांडला, पण बीडच्या बहाद्दर जनतेने माझ्या पाठीशी आशीर्वाद दिले. आता विरोधक पुढचे पाच वर्ष कसा निधी आणता अन कसा विकास करतात अशा धमक्या देत आहेत. पण जनतेच्या विकासासाठी वेळ पडली तर सरकार विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा बीडचे नवनिर्वाचित आ संदीप क्षीरसागर यांनी दिला.मायबाप जनतेने मला कधीही एकटे पडू दिले नाही. सगळे बीडच माझे कुटुंब आहे. जनसमान्यांच्या आशिर्वादानेच मी दुसर्यांदा आमदार झालो असून त्यांच्यासाठी पूर्णवेळ उपलब्ध असेन असे आ.संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात व्यक्त होताना सांगितले.
रविवारी (दि.१) रोजी नागरी सत्कार समितीच्या वतीने आ.संदीप क्षीरसागर यांचा, दुसर्यांदा आमदार पदी निवडून आल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
रविवार (दि.१) रोजी बीड शहरातील रामकृष्ण लॉन्स येथे नागरी सत्कार समिती, बीड यांच्या आयोजनाने सलग दुसर्यांदा विधानसभा सदस्यपदी निवडून आल्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी समस्त बीडकरांच्या वतीने आ.क्षीरसागर यांचा अभूतपूर्व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ.संदीप क्षीरसागर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. निवडणुकीत आपल्याकडे शेकडो प्रवेश झाले. परंतु हे प्रवेश कसल्याही अटी आणि शर्ती विना झाले. विरोधकांनी निवडणूक काळात अक्षरशः पैशांचा बाजार मांडला होता. परंतु बीडच्या जनतेने भूमिकेशी तडजोड न करता एकनिष्ठ राहिल्याने माझी साथ दिली. आता मला माझ्या बीडकरांनी निवडून दिले आहे. मी दुसर्यांदा आमदार झालो आहे. परंतु काही लोकांचा प्रश्न आहे, आता आपण सत्तेत नाही मग परत आपल्याला निधी मिळणार नाही! पण आता या गोष्टीची काळजी करायची गरज नाही. मागील तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा सरकारने अडवून धरलेल्या आहेत. आता या निवडणुका होणार आहेत.
या निवडणुका होऊन प्रशासक राज जेव्हा हटेल तेव्हा लोक निहाय निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना देणे अनिवार्य असते. सत्ताधाऱ्यांचा त्यातील एक रूपयाही कमी करता येत नाही. त्यामुळे आता विकास कामे आणि निधी यांची चिंता करण्याची कसलीही गरज नसल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले. यासोबतच मी अगोदरच सांगुन टाकले आहे की, ‘जरांगे पाटील म्हणतील तसं…’ असे सांगत मराठा आरक्षणाबाबत आपली स्पष्ट आणि उघड भूमिका असल्याचेही आ.क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. त्याबरोबरच पत्नी नेहाताई क्षीरसागर आणि बंधू अर्जून क्षीरसागर यांनीही निवडणूक काळात साथ दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास प्रामुख्याने खा.बजरंग सोनवणे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनील धांडे, माजी आ.उषाताई दराडे, कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते रविंद्र दळवी, राजेंद्र मस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, उदयसिंह जी देशमुख, जेष्ठ विधीज्ञ ॲड.बाळासाहेब कोल्हे, जेष्ठ नेते डी.बी.बागल, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद खमरूल, अखिल मौलाना साहेब, इक्बाल मौलाना साहेब, ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे बीड जिल्हाध्यक्ष हाजी शेख जाकेर महेबुब यांच्यासह त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी, जेष्ठ विधीज्ञ ॲड.विवेकानंद सानप, वैजनाथ तांदळे, खुर्शीद आलम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि बीड शहर, ग्रामीण एकूण मतदारसंघातील सर्व भागातून बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदीपभैय्यांचे विरोधक पत्रकार परिषद घेऊन विचारत आहेत की, संदीपभैय्यांनी त्यांचे व्हीजन काय ते सांगावे. आता हा प्रश्न विचारण्याचा अधिकार केवळ बीडच्या जनतेला आहे. परंतु तरीही मी एक प्रश्न त्या विरोधकांना विचारू इच्छितो, जर संदीपभैय्यांकडे व्हीजन नसते तर बीडकरांनी त्यांना सलग दुसऱ्यांदा निवडून आणुन आमदार केले असते का? असा सवाल खा.बजरंग सोनवणेंनी या कार्यक्रमातून विरोधकांना केला. बीडकरांनी दुसर्यांदा वाघ विधानसभेत पाठवला आहे. हा खासदार बजरंग सोनवणे कायम तुमच्यासोबत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. संदीपभैय्यांच्या रूपाने पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा झेंडा बीडमध्ये फडकला आहे. असे खा.बजरंग सोनवणे यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले.
Leave a Reply