बीड -बीड विधानसभा मतदारसंघात दोन भावात लढत होणार आहे. या दोघात कोण बाजी मारणार याची चर्चा गेल्या दोन दिवसापासून सुरु आहे. बीड मतदारसंघात शहरात 98 हजार तर ग्रामीण भागात एक लाख चाळीस हजार मतदान झाले आहे.
बीड मतदारसंघात विद्यमान आ संदीप क्षीरसागर आणि फोन योगेश क्षीरसागर या दोघात लढत झाली. अपक्ष उमेदवार अनिल जगताप, ज्योती मेटे आणि स्वराज्य सेनेचे कुंडलिक खांडे यांनी देखील जोरदार प्रचार केला.
मात्र मतदानाच्या दिवशी संदीप आणि योगेश या दोघातच खरी लढत असल्याचे स्पष्ट झाले. बीड शहरात तब्बल 98 हजार मतदारांनी मतदान केले, यामध्ये जवळपास 59 टक्के मतदान हे मुस्लिम समाजाचे झाले आहे.
ग्रामीण भागात एक लाख चाळीस हजार मतदान झाले. विशेषतः पाली, चौसाला, लिंबागणेश या सर्कल मध्ये 65 ते 70 टक्के मतदान झाले. बीड मतदार संघात दोन भावात ओबीसी आणि मराठा अशीच फाईट झाल्याचे चित्र दिसून आले.
दोन लाख अडोतीस हजार मतदारांनी नेमकं कोणाला निवडलं आहे हे उद्या म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.
Leave a Reply