बीड- बीड शहरातील एसपी ऑफिससमोर राहणाऱ्या डॉ विशाल हजारी यांच्या मुलाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.जुन्या ओळखीतून जय विशाल हजारी याचे अपहरण करण्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
मनीष प्रकाश क्षीरसागर आणि शैलेश संतोष गिरी या दोघांनी मंगळवारी सायंकाळी जय विशाल हजारी याला घराबाहेर बोलावून घेतले.तेथून गाडीवर बसवून त्याला धानोरा रोड भागात नेले.त्या ठिकाणी गेल्यावर या दोघांनी जय ला लोखंडी रॉड ने मारहाण करत वीस लाख रुपयांची खंडणी मागितली.
त्याच्या डोक्याला पिस्तुल लावून खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र जय ने या दोघांच्या तावडीतून आपली सुटका करून घेत घर गाठले.घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी मनीष आणि शैलेश यादोघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून पिस्तुल आणि रॉड जप्त करण्यात आला आहे.
Leave a Reply