बीड -विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शासकीय, निमशासकीय तसेच संस्थेवरील कर्मचाऱ्यांना सहभागी होता येतं नाही. मात्र बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर, डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि फोन योगेश क्षीरसागर यांच्या ताब्यातील शाळा, महाविद्यालय आणि बँकेतील तसेच इतर संस्थेमधील कर्मचारी सर्रास प्रचारात सहभाग घेत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार आ संदीप क्षीरसागर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत सगळीकडे दिसून येतं आहे. प्रत्येक उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना भेटून मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.
बीड जिल्ह्यात बीड विधानसभा मतदारसंघात आ संदीप क्षीरसागर विरुद्ध डॉ योगेश क्षीरसागर या दोन भावात लढत होतं आहे. माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ योगेश यांना पाठिंबा दिला आहे.
बीड मतदारसंघात जयदत्त क्षीरसागर आणि डॉ योगेश क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेल्या नवगण शिक्षण संस्था, आदर्श शिक्षण संस्था, विनायक युवक कल्याण संस्था आणि अनंत कृषी प्रतिष्ठान या संस्थेतील सर्वच कर्मचारी हे डॉ योगेश आणि इतर दोन तीन उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभागी आहेत.
अनेक कर्मचारी सभा,कॉर्नर बैठका, प्रचार साहित्याचे वाटप करत आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वर उमेदवारांचे फोटो, बॅनर, व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल होतं आहेत.
याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आ संदीप क्षीरसागर यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकारणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आ क्षीरसागर यांनी केली आहे.
Leave a Reply