News & View

ताज्या घडामोडी

358083262 811954323621002 2364445206209669696 n5642985757709638304

मी बीडच्या जनतेची माफी मागतो -धनंजय मुंडे!

बीड -गेली पाच वर्ष विद्यमान आमदारामुळे जनतेला जो काही त्रास झाला त्यामध्ये मी सुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे मी जनतेची माफी मागतो असं म्हणत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तेवीस तारखेला योगेश च्या विजयाच तुफान आहे हे सांगतो असे म्हटले.

बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

मागील पाच वर्ष विद्यमान आमदारामुळे जो काही जनतेला त्रास झाला त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो.अहंकारी लोकप्रतिनिधी मी जीवनात पहिला नाही. वाटलं होतं चांगला असेल. तो दिवा ज्याला आपण दीप म्हणतो तो असा काही विझणार आहे कि पुन्हा कुठंच दिसणार नाही. असं म्हणत मुंडे यांनी आ संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केली.

त्यांनी अनेक कामाचे श्रेय घेतलं. पण जनता श्रेय देणार नाही.दादांचे मनापासून आभार मानतो, शेवटचा अर्थसंकल्प मांडताना लाडक्या बहिणीसाठी योजना आणली. मात्र महाविकास आघाडीने त्यावर टीका केली.

लाडकी बहीण, लाडका भाऊ,लाडका शेतकरी योजना सुरु केल्या. विरोधकांची तोंड बंद झाली.पुन्हा महायुती चे सरकार येणार आहे, ज्यांनी ज्यांनी योजनेला विरोध केला त्यांना सुद्धा एखादी लाडकी योजना द्या.

माझ्यावर टीका केली, परळीत येऊन करा ना, ठाकूर तो गयो हा डायलॉग मारला. तू तो गयो असं म्हणत धनंजय मुंडे यांनी संदीप यांचे नाव ना घेता त्यांच्यावर टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *