बीड -गेल्या पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी स्टेजवरील अनेकांनी आमदाराला निवडून दिले. मात्र त्याने टक्केवारी घेऊन कामे अडवली. एल ए क्यू करायचे अन सेटलमेंट करून माघारी घ्यायचे हा यांचा आवडता धंदा आहे अशी टीका बीड विधानसभा मतदारसंघाचे महायुती चे उमेदवार डॉ योगेश क्षीरसागर यांनी केली.
बीड येथे आयोजित अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या सभेत डॉ क्षीरसागर बोलत होते.
बीडचा कोरोना घालवायचा आहे. अनेकांनी त्रास सहन केला आहे. पाच वर्ष बीडच्या जनतेने हाल अपेष्टा सहन केल्या. समाजाच्या जातीच्या नावावर फेक नरेटिव्ह सेट केले जातं आहेत.
बाबरी मस्जिद ज्यावेळी पाडली तेव्हा मी आणि संदीप कुठंतरी लहानपणी खेळत असू. पण गैरसमज पसरवले जातं आहेत. जातीय तेढ निर्माण केली जातं आहे. रामगिरी महाराज असतील किंवा नितेश राणे यांचं खंडण मी केलं आहे.
दादांनी वादा केला होता अल्पसंख्यांक समाजाला सोबत घेऊ तो पूर्ण केला आहे. दादांचा अभिमान वाटतो, सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत काम करतात. माझ्यासारख्या नवयुवकाला संधी दिली. त्याबद्दल आभार. अण्णा आणि अध्यक्ष यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही काम करत आहोत.
Leave a Reply