बीड -माझा बीड जिल्ह्यात फक्त योगेश क्षीरसागर यांनाच पाठिंबा आहे, इतर कोणत्याही उमेदवाराबाबत निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट करत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका विषद केली.पांगलेली घर अन विखूरलेली मन एकत्रित आले आहेत. मी उमेदवारी भरली, सगळ्यांनी समर्थन दिलं परंतु समीकरणाचा विचार करून निर्णय घेतला. अंतरमनाने निर्णय दिला अन माघार घेतली अशी माहिती माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माझे तीन पिढ्याचे संबंध आहेत. मी अडचणीत उभा राहिलो अन पुढेही राहील हा शब्द देतो. जय पराजय अनेकदा पाहिले. परंतु हा प्रसंग वेगळा आहे.मेळ बसावा म्हणून निर्णय घेतला. परिवार संघटित व्हावा म्हणून प्रयत्न केले.
विस्तारित परिवाराचे हितसंबंध राखण हे आमचं काम आहे.योगेशला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. हजारो फोन आले. आत निर्णय घेतला आहे. साथ द्या.असे आवाहन त्यांनी केले.
आपण लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराला विरोध केला, पराभूत केलं आता महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा कस काय हा प्रश्न न्यूज अँड व्यूज णे विचारला असता ते म्हणाले कि,आजकाल कोण कधी कोणासोबत राहील आणि बाजूला जाईल याचा नेम नाही त्यामुळे आपण लोकसभेत घेतलेली भूमिका आणि आजचा निर्णय हे वेगवेगळे आहेत असे मत क्षीरसागर यांनी व्यक्त केले.तसेच अजित पवार यांच्या व्यासपीठावर जायचे कि नाही याचा निर्णय देखील झालेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यासपीठावर उमेदवार डॉ योगेश क्षीरसागर, डॉ सारिका क्षीरसागर, डॉ विठ्ठल क्षीरसागर, जगदीश काळे, हेमंत क्षीरसागर, रोहित क्षीरसागर, विजया महेंद्रे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
Leave a Reply