News & View

ताज्या घडामोडी

images 2023 08 23T112522.579

जयदत्त क्षीरसागरांचा डॉक्टरांना आशीर्वाद!

बीड -माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत आपले आशीर्वाद डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले आहे.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात चाळीस वर्षांपासून आपले वर्चस्व कायम ठेवणारे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघनातून विधानसभेसाठी अपक्ष अर्ज भरला होता.

मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतल्याने खळबळ उडाली होती. फोन पुतणे विरुद्ध काका अशी लढत झाल्यास मतविभाजन होऊन त्याचा फटका तिघांना बसेल ही शक्यता लक्षात घेऊन त्यांनी माघार घेतल्याची चर्चा होती.

माघारीनंतर जयदत्त क्षीरसागर कोणत्या पुतण्याच्या पाठीशी उभे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान मंगळवारी त्यांनी कार्यकर्ता बैठक घेत आपण डॉ योगेश यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *